अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या
Nashik: कौटूंबिक कारणातून पत्नी माहेरी निघून गेल्याने संतप्त पतीने स्वःताच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतल्याची घटना. (Suicide).
नाशिक : कौटूंबिक कारणातून पत्नी माहेरी निघून गेल्याने संतप्त पतीने स्वःताच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतल्याची घटना क्रांतीनगर भागात घडली. जखमी पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद राजाराम चव्हाण (वय ३०, रा. साई लॉन्स बाजूला नांदूरनाका) असे मृत पतीचे नाव आहे. चव्हाण दांम्पत्याचा कौटूंबिक वाद झाला. त्यामुळे पत्नी मनिषा चव्हाण क्रांतीनगर भागातील उबाळे चाळीत राहणाऱ्या आईच्या घरी निघून गेली. पत्नीस विनवण्या करूनही ती माघारी येत नसल्याने सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास चव्हाण याने सासूरवाडी गाठून स्वःताच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून आहेत.
घेतले. या घटनेत तो गंभीर भाजल्याने मेव्हणा ऋषीकेश पवार यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना गुरूवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.
याबाबत पोलिस नाईक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हवालदार शेळके करीत आहे.
Web Title: young man committed suicide by pouring petrol on his body and setting himself on fire
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App