Home महाराष्ट्र ‘तुला भेटून चूक झाली’ म्हणत तरूणाने संपवलं आयुष्य, मुलीवर गुन्हा दाखल

‘तुला भेटून चूक झाली’ म्हणत तरूणाने संपवलं आयुष्य, मुलीवर गुन्हा दाखल

Crime News: मुलीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

young man committed suicide after getting tired of the girl's troubles

मुंबई: मुंबईच्या अंधेरी येथील साकिनाका भागात एका तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. प्रथम होवाळ असे या 20 वर्षीय तरूणाचे नाव होते. साधारण महिन्याभरापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात ही घटना घडली होती. मात्र या आत्महत्येमागचं खरं कारण समोर आले नव्हते. आता हे प्रकरण उघडकीस आले आहे. प्रथम होवाळ याच्या आत्महत्येमागे आता एका मुलीचा हात असल्याचा समोर आले आहे. या संबंधित आता मोठा पुरावा देखील हाती लागला आहे. हा पुरावा पाहून त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

साकिनाका मधील व्यापारी सचिन होवाळ (46) यांचा मुलगा प्रथम होवाळने नोव्हेंबर महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र प्रथमच्या आत्महत्येमागचं ठोस कारण समोर आले नव्हते. त्यामुळे वडिलांनी देखील प्रश्न पडला होता की, नेमकी प्रथमने आत्महत्या का केली? यामुळे ते चिंतेत देखील होती. असे असताना प्रथमच्या मित्राने या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आणलाय.

प्रथमच्या मित्राने वडिलांना सांगितले की, प्रथम जुलै 2022 पासून एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या नात्यात असताना मुलीने प्रथमकडून शॉपिंगसाठी एक लाख रूपये मागितले होते. जर हे पैसे न दिल्यास त्याच्यासोबत नाते तोडण्याची धमकी तिने दिली होती. मुलगी इतक्यावरच थांबली नाही तर तिने प्रथम विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच पैसे न दिल्यास दुसरा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती.

तसेच प्रथमच्या मित्राने प्रथमच्या जुन्या फोनमधील काही ऑडिओ क्लिप्स आणि चँट्स देखील वडिलांना दाखवले होते. ज्यामध्ये तिने प्रथमचा छळ केल्याचे स्पष्ट होत होते. याच छळाला कंटाळून प्रथमन गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी प्रथमने 11 ऑक्टोबर 2O23 ला मुलीला मेसेज केला होता. या मेसेजमध्ये प्रथम तिला म्हणाला की, ‘तुला भेटून माझी चुक झाली. मला मरायचे नाही. कृपया मला मारू नको’ अशा आशयाचा मेसेज केला होता. या मेसेजनंतर साधरण 31 ऑक्टोबरपर्यंत तरूणी त्याच्या संपर्कात होती. त्यानंतर 1 नोव्हेंबरला त्याने आपले आयुष्य संपविले. या घटनेने खळबळ उडाली होती.

या प्रकरणी आता सचिन ओवाळ यांनी मुलीच्या त्रासाला कंटाळून प्रथमने आत्महत्या केल्याचा आरोप केला. तसेच मुलीविरूद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: young man committed suicide after getting tired of the girl’s troubles

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here