Home Suicide News सोशियल मेडीयावर धक्कादायक संदेश पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

सोशियल मेडीयावर धक्कादायक संदेश पोस्ट करत तरुणाची आत्महत्या

Young man commits suicide by posting shocking messages 

राहता | Suicide: राहता तालुक्यातील जळगाव येथील एका २४ वर्षीय तरुणाने आपल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याअगोदर या तरुणाने सोशियल मेडीयावर एका पोलीस कर्मचारी छळ करीत असल्याचा आशयाचा संदेश व्हायरल केला होता.

सुजित बाबासाहेब चौधरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी सुजित घरातून बाहेर गेला. तो उशिरापर्यंत परत आला नाही म्हणून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता घराजवळच्या विहिरीजवळ त्याचा मोबाईल आढळून आला.

दरम्यान त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरून एका पोलीस कर्मचाऱ्याचे नाव घेऊन हा कर्मचारी माणसांद्वारे आपला छळ करीत आहे. त्याच्या छळास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल केला. हा संदेश वाचल्यानंतर अनेकांनी चौकशी केली असता घरा जवळच्या विहिरीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शावविचेदन करण्यात आले आहे.  

Web Title: Young man commits suicide by posting shocking messages 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here