Home महाराष्ट्र होळीच्या दिवशी मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

होळीच्या दिवशी मोबाईलवर व्हिडीओ बनवत तरुणाची आत्महत्या

Young man commits suicide by making video on mobile

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात गुरुवारी होळीच्या दिवशी एका तरुणाने मोबाईलवर व्हिडिओ बनवत विषारी औषध प्राशन करत एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सुनील ढगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील एका निर्जनस्थळी बसून व्हिडीओ बनवत दोन बाटल्या विषारी औषध प्राशन करत तरुणाने आत्महत्या (Suicide )केली. तरुणाचा आत्महत्या करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विष प्राशन केल्याने काही वेळातच त्याचा जीव गेला. मात्र या तरुणाने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Young man commits suicide by making video on mobile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here