Home जळगाव Suicide | व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Suicide | व्हॉट्सअप स्टेटस ठेवून तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Young man commits suicide by jumping into a well with WhatsApp status

पाचोरा | जळगाव: म्हसास (ता. पाचोरा) येथील तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये आत्महत्येबाबतचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवून गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शुक्रवारी घडली

म्‍हसास येथील कैलास पाटील (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येसंदर्भातील स्टेटस आपल्या मोबाईलमधील व्हॉट्सअपवर लावले व लगेचच गावालगत असलेल्या काकांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नातलग व मित्रांनी स्टेटस पाहून त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ. अमित साळुंके यांनी त्यास मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. मयत कैलास पाटील याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. पाचोरा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Ttile: Young man commits suicide by jumping into a well with WhatsApp status

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here