अहिल्यानगर: ११ दिवसांवर लग्न, तरुणाची आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन अविवाहित तरुणाने आत्महत्या.
राहुरी : राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील विजय जाधव या २२ वर्षीय अविवाहित तरुणाने काल दि. ३० मे रोजी दुपारच्या सुमारास झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विजय दिगंबर जाधव, हा तरुण राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे राहत होता. काल दि. ३० मे रोजी दुपारी १.३० वाजे दरम्यान विजय जाधव हा त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन अविवाहित तरुणाने आत्महत्या केली. ही घटना राहुरीतील तांभेरे येथे शुक्रवारी (दि. ३०) दुपारी घडली. विजय दिगंबर जाधव (वय २२) असे मयत तरुणाचे नाव आहे. विजय दिगंबर जाधव याचा मंगळवारी (दि. १० जून) विवाह ठरला होता. ११ दिवसांवर लग्न आले असताना शुक्रवारी दुपारी विजय हा त्याच्या घराजवळ असलेल्या एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विजय याला राहूरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी क्षीरसागर यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.
Breaking News: Young man commits suicide after 11 days of marriage