संगमनेर: आजीसोबत घरी जाताना तरुणीचा विनयभंग
Breaking News | Sangamner Crime: एक २२ वर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घरी जात असताना तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन सदरा ओढत विनयभंग (Molested) केल्याची घटना.
संगमनेर: शहराजवळील घुलेवाडी येथे एक २२ वर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घरी जात असताना तरुणाने तरुणीचा पाठलाग करुन सदरा ओढत विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि. 21 जून) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत लोणी येथील तरुणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली बावीसवर्षीय तरुणी आपल्या आजीसोबत घुलेवाडी येथे घरी जात होती. त्याचवेळी आकाश दत्तात्रय बलसाने (रा. लोणी, ता. राहाता) या तरुणाने साईश्रद्धा चौकात पाठलाग करुन तरुणीच्या अंगावरील सदरा ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी तरुणीने सदरा फाटल्याने आरडाओरड केली असता आकाश बलसाने याने शिवीगाळ व दमदाटी करुन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आकाश बलसाने याच्यावर विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. वायकर या करत आहे.
Web Title: Young girl molested while going home with grandmother
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study