महिन्याभरापूर्वीच झाला होता विवाह, युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी मृत्यू
Accident: २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
नाशिक: शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राकेश दिनेश धोंडगे असे मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. मुळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.
शनिवार (दि.२२) रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यात तो दबला गेला.
यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टरखाली दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अवघ्या महिन्याभरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता. मात्र, या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने संसार उध्वस्त झाला आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे पुढील तपास करत आहेत.
Web Title: Accident young farmer’s tractor overturned and met an unfortunate end
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App