Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट; Ahmednagar Rain Alert

अहमदनगर जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट; Ahmednagar Rain Alert

Ahmednagar Rain Alert: अहमदनगर जिल्ह्याला आज ३० सप्टेंबर आणि उद्या १ ऑक्टोबरला यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Yellow Rain alert for Ahmednagar for two days

अहमदनगर: जिल्ह्यात पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. आज 30 सप्टेंबर व उद्या 1 ऑक्टोबरला जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपासून नगर शहरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळ पाचपासून शहराच्या विविध भागात पावसाची पाऊस सुरु होता.

नगर शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागात मागील आठवड्यात गणेशोत्सावाच्या दुसर्‍या दिवसापासून दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे बळीराजासह सामान्य नागरिक सुखावला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी देखील नगर शहरात रात्री 9 च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यामुळे बाप्पांना निरोप देणार्‍या मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगर शहर आणि उपनगरात पावसाला सुरूवात झाली. आधी जोरदार पावसानंतर रात्री उशीरापर्यंत पावसाच्या जोरदार सरीवर सरी कोसळत होत्या.

पुढील दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. संभाव्य पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात, वादळी वारे वाहत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil

तसेच राज्यातील सर्वच भागात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्यावतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Yellow Rain alert for Ahmednagar for two days

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here