Rape | धक्कादायक! दाउदच्या नावाची धमकी देत लेखिकेवर बलात्कार
Mumbai Rape Case | मुंबई: अंडरवर्ल्ड दाउद इब्राहिम याच्या नावाची धमकी देत जुहुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका व्यावसायिकाने ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. तसेच कोठे वाच्यता केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी ७५ वर्षीय व्यावासायीका विरोधात अंबिका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बलात्काराच्या एका गुन्ह्यात चक्क दाऊदच्या नावाने धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
अंबोली पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय लेखिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दादरमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय व्यावसायिकाने तिच्यावर अंधेरीच्या जेबीनगर येथील सन अॅण्ड शील (आताचे नाव द ऑन टाईम हॉटेल) येथे मे महिन्यात वेळोवेळी लैंगिक छळ केला आहे.
याच दरम्यान व्यावसायिकाने तिच्याकडून २ कोटी व्याजाने घेऊन ते परत न केल्याचाही दावा केला आहे. या पैशासाठी त्याच बरोबर महिलेवर केलेल्या अत्याचारबाबत (abused) महिलेने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता. व्यावसायिकाने महिलेला थेट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावले.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम माझा मित्र असून हाजी मस्तान माझा पत्नीच्या बहिणीचा नवरा होता. याबाबत कुठेही वाश्चता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी (threatening) व्यावसायिकाने दिली असल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा (Crime Filed) दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासाठी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Writer rape for threatening dawoods name