Home क्राईम Murder: कामगाराचा दगडाने ठेचून खून  

Murder: कामगाराचा दगडाने ठेचून खून  

Worker using Stone murder

पुणे | Murder: वाघोलीजवळ आव्हाळवाडी परिसरात एका कामगाराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. विष्णू सुनील दास वय ४० रा. गणेशनगर वाघोली असे या खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांकडे पोलीस पाटील उमेश बबन आव्हाळे यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटना मंगळवारी सायंकाळी ते बुधवारी ३ पर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

विष्णू दास हा त्याच्या पत्नीसोबत गणेशनगर येथे वास्तव्यास होता. दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दास हा बाजारात गेला होता. त्यावेळी काही लोकांसोबत वाद झाल्याची माहिती मिळते. अव्हाळवाडी येथील राजेश घुले यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या तोंडावर, डोक्यावर, डोळ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत,

या घटनेची माहिती समजताच लोणीकंद पालीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन पवार हे करीत आहे.

Web Title: Worker using Stone murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here