Home अहमदनगर सराफी दुकानातून बुरखाधारी महिलांनी लांबविले तीन लाखांचे दागिने

सराफी दुकानातून बुरखाधारी महिलांनी लांबविले तीन लाखांचे दागिने

Ahmednagar News:  दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाख रुपये किमतीचे सुमारे चार तोळे दागिने व एक लाख किमतीचा हिऱ्याचा हार असा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. (theft).

women stole jewelry worth three lakhs from Sarafi shop

नगर : शहरातील कल्याण ज्वेलर्समधून दोन बुरखाधारी महिलांनी दोन लाख रुपये किमतीचे सुमारे चार तोळे दागिने व एक लाख किमतीचा हिऱ्याचा हार असा तीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. सोमवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

याबाबत सेल्समन पूजा श्याम जगताप (वय ३३ रा. मोरया कॉलनी, नगर) यांनी मंगळव- ारी (दि. ७) रात्री १० वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले, सोमवारी सकाळी रात्री आठ वाजता दोन बुरखाधारी महिला दागिने खरेदीसाठी दुकानात आल्या. त्यांनी नेकलेस खरेदी मागणी केली. त्यांना दागिने दाखविण्यात आले. यावेळी दुकानातील अन्य कामगारही हजर होते. सेल्समन जगताप यांची नजर चुकवून त्या दोन महिलांनी तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केला. त्या महिलांचा शोध घेतला. परंतु, सापडल्या नाहीत. तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: women theft jewelry worth three lakhs from Sarafi shop

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here