धक्कादायक! शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा कोयत्याने खून
Pune Crime: महिलेवर दगडाने आणि कोयत्याने वार करून तिचा खून खून केल्याचे उघडकीस, महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
पुणे: पुण्याच्या मांजरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या एका पुरातन विहिरीत उषा देशमुख या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. शेळ्या चारण्यासाठी ही महिला या परिसरात आली होती. या महिलेवर दगडाने आणि कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. निर्जन स्थळ असल्याने कुठलाही पुरावा आरोपीने मागे सोडला नव्हता. मात्र असं असतानाही हडपसर पोलिसांनी कौशल्याने तपास केला आणि आरोपी राजेश अशोक मुळेकर याला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 24 एप्रिलच्या दुपारी 3 वाजता उषा देशमुख या शेळ्या चारण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत गेल्या होत्या. यावेळी आरोपी त्या परिसरात असणाऱ्या खजाना विहिरीवरील मोटर चोरून घेऊन जात होता. उषा यांनी आरोपीला पाहिलं आणि हटकलं. तुझ्याबाबत येथील अधिकाऱ्यांना सांगते असंही त्या म्हणाल्या. उषा देशमुख यांच्या या एका वाक्याने आरोपी घाबरला आणि त्याने या भीतीपोटीच त्यांचा खून केला.
आरोपी राजेश मुळेकर हा सराईत गुन्हेगार आहे. पाच दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून आला होता. मात्र चोरी करताना पकडला गेल्याने पुन्हा तुरुंगात जावे लागेल अशी त्याला भीती होती आणि या भीतीपोटीच त्याने उषा देशमुख यांचा अतिशय निर्घृणपणे खून केला. हे कृत्य करताना त्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली होती. मात्र तरीही पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला अटक केली आहे.
Web Title: woman who went to graze goats was Murder by a coyote
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App