Home क्राईम धक्कादायक! प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

धक्कादायक! प्रेमासाठी पतीला सोडलेल्या महिलेची प्रियकराने केली हत्या

Breaking Crime News: प्रियकरानेच खदानीत ढकलून खून (Murder) केल्याची घटना.

woman who left her husband for love was Murder by her lover

चाकण |पुणे: प्रियकराशी लग्न व्हावे, यासाठी तिने पतीला सोडले, पण प्रियकराने दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा घाट घातला. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावत होती. यावरून प्रियकराने महिलेचा खदानीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना  ९ जानेवारी रोजी खराबवाडी येथील स्टोन क्रशरच्या खदानीत घडली.

देवेंद्रकुमार श्यामलाल लोधी (वय २७ वर्षे रा. खराबवाडी, ता. खेड. मूळ रा. मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत महिला आणि आरोपी देवेंद्रकुमार यांचे सन २०१० पासून प्रेमसंबंध होते. सन २०१८ मध्ये महिलेचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतर ती पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी माहेरी येऊन राहू लागली. त्यानंतर, तिचे देवेंद्रकुमार यांच्यासोबत पुन्हा बोलणे होऊ लागले. दरम्यान, देवेंद्रकुमार याची त्याच्या भावाच्या मेहुणीसोबत लग्नाची बोलणी सुरू झाली.

ही बाब महिलेला समजली असता, तिने ‘लग्न करेन, तर तुझ्यासोबतच करीन, तुझ्यासोबतच राहीन,’ असा देवेंद्रकुमार याच्याकडे तगादा लावला. त्यामुळे तिचा खून करण्याचे ठरवून देवेंद्रकुमार याने तिला गावावरून बोलावून घेतले. दुचाकीवरून तिला खराबवाडी येथील डोंगरावर नेले. त्यानंतर, जवळच असलेल्या स्टोन क्रशरमधील खदानीमध्ये उंचावरून ढकलून दिले. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: woman who left her husband for love was Murder by her lover

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here