Home संगमनेर संगमनेर: वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! डॉक्टरकडून उपचारसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

संगमनेर: वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! डॉक्टरकडून उपचारसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग

Breaking News | Sangamner Crime: टॉन्सिल तपासत असताना त्यांनी पीडित महिलेच्या गळ्याला एक हात लावला आणि दुसऱ्या हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Woman who came for treatment molested by doctor

संगमनेर: संगमनेरमध्ये यापूर्वी विनयभंग आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिष्ठा डागाळली आहे. एका डॉक्टरने केलेल्या कथित छेडछाडीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे वैद्यकीय समुदायातील नैतिक मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याप्रकरणी डॉ.राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, संगमनेर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, २२ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास कुरान येथील डॉ. इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये घडली.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मागील दोन दिवसांपासून टॉन्सिल्सच्या त्रासाने त्रस्त होती. उपचारासाठी ती आपल्या मुलासोबत डॉ. राहुल इंगळे यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी महिलेचा मुलगा क्लिनिकच्या बाहेर थांबला होता, तर पीडित महिला एकटीच डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली.

डॉ. इंगळे यांनी तिला दवाखान्यातील बेडवर झोपण्यास सांगितले. तपासणीसाठी आले असता त्यांच्या तोंडाला दारू प्यायल्यासारखा वास येत होता. टॉन्सिल तपासत असताना त्यांनी पीडित महिलेच्या गळ्याला एक हात लावला आणि दुसऱ्या हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75, 79 नुसार गुन्हा (गुरनं. 667/2025) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.

Breaking News: Woman who came for treatment molested by doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here