Rape | धक्कादायक! भरदिवसा पोलीस आयुक्तालयाच्या जवळच महिलेवर बलात्कार
Pimpri | पिंपरी: महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असताना एक धक्कादायक बलात्काराची (rape) घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर भरदिवसा महिलेवर लैंगिक अत्याचाराची (Sexually abusing) घटना घडली आहे. याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून एका वॉचमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे १६ मे रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत २७ वर्षीय महिलेने रविवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार, सरोज देविराम बिस्ता वय २८ रा. चिंचवड मुळ रा. नेपाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला १६ मे रोजी जेवण झाल्यावर दुपारी प्रेमलोक पार्क येथे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाजवळ पायी फेरफटका मारत होती. त्यावेळी आरोपी वॉचमनने फिर्यादी महिलेला जवळ बोलावून त्यांना जवळच असलेल्या पत्रा शेडमध्ये घेऊन गेला. तेथे आरोपीने फिर्यादीशी अश्लील चाळे केले. महिलेने आरडाओरडा केला असता फिर्यादी महिलेचे घर खाली करण्यास सांगेन अशी धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: woman was rape near the Commissionerate of Police