Home संगमनेर संगमनेर:  महिलेचा विनयभंग करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

संगमनेर:  महिलेचा विनयभंग करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

Breaking News | Sangamner:  पठार भागातील 40 वर्षीय दलित महिलेचा विनयभंग करत, जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून घारगाव पोलिसांत सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा.

woman was molested and threatened with death

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील चाळीस वर्षीय दलित महिलेचा विनयभंग करत, जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून घारगाव पोलिसांत सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित शेतकरी महिलेच्या कुटुंबाचे एका जणाशी शेतीवरून वाद आहेत. महिला पतीसह बुधवारी (दि. ३१) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात गेले, त्या वेळी तेथे आरोपी, त्याची पत्नी, दोन मुले व अनोळखी दोन जण आले.या शेतात पाय ठेवायचा नाही, अशी धमकी दिली व दोघांना जातिवाचक शिवीगाळ केली. ‘तुमची लायकी काय?’ असे म्हणत महिलेचा हात धरून ओढले व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद संबंधित महिलेने दिली आहे. घारगाव पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: woman was molested and threatened with death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here