Home क्राईम महिलेवर सामूहिक अत्याचार करून विष पाजून ठार मारले

महिलेवर सामूहिक अत्याचार करून विष पाजून ठार मारले

Yavatmal Crime: एका महिलेला कामावर घेवून जाताना सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Raped) करून तिला विष पाजून ठार (Murder) मारण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

a woman was Gang raped and Poisoned to Death

यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील पहापळ येथे एका महिलेला कामावर घेवून जाताना सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिला विष पाजून ठार मारण्यात आल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली. या घटनेप्रकरणी अखेर पांढरकवडा पोलिसांनी सोमवार, १० जुलै रोजी खुनासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली. या घटनेने पांढरकवडा तालुक्यात खळबळ उडाली.

अण्णाराव भीमा धोत्रे (७३) व रामकिसन राजा शिंदे (५५) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर रत्नमाला (३५) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहापळ येथील अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनी २३ जून रोजी सकाळी रत्नमालाला कामावर नेण्याच्या बहाण्याने सोबत नेले. दुपारी तिला घरी आणून सोडले. पुन्हा सायंकाळी तिला सोबत नेले. रात्री या नराधमांनी तिला दारू पाजून पहाटे ४.३० वाजेपर्यंत तिच्यावर पाशवी अत्याचार केला. त्यानंतर तिला विषारी औषध पाजले. बेशुद्ध अवस्थेत तिला घरी नेऊन सोडण्यात आले. मात्र शरीरात विष गेल्याने ती तडफडत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने तिला पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. २६ जून रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून सोमवारी अण्णाराव धोत्रे व रामकिसन शिंदे या दोघांनाही अटक केली.

Web Title: a woman was Gang raped and Poisoned to Death

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here