भरणा घेणाऱ्या मुलासमवेत फोनवर बोलते.. बचत गटाच्या महिला अध्यक्षाला मारहाण
Breaking News | Ahmednagar: बचत गटाच्या महिला अध्यक्षाला जबर मारहाण केल्याची घटना.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यात बचत गटाच्या महिला अध्यक्षाला जबर मारहाण केल्याची घटना घडली. ही मारहाण तिला तिच्या पतीनेच केल्याचे समजले आहे.
भरणा घेण्यासाठी येणाऱ्या मुलासमवेत फोनवर का बोलते? असा संशय घेत ही मारहाण झाली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे.
येथील एका बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. पोलिस ठाण्यात पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली प्रवरा येथे २२ वर्षीय महिला एका बचत गटाची अध्यक्षा म्हणून काम पाहते. ३० जून रोजी सायंकाळी पीडित महिला व मुले घरात असताना पती त्या ठिकाणी आला. त्याने महिलेला विचारणा करीत बचत गटाच्या फायनान्स कंपन्यांचा भरणा घेण्यासाठी येणाऱ्या मुलासमवेत फोनवर का बोलते? त्याच्याशी तुझे काय संबंध आहे का? अशी विचारणा केली.
यावर पत्नीने मी बचत गटाच्या कामानिमित्त बोलत असते. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नसून फक्त कामाबाबत बोलते. तुम्ही असे का बोलता? माझ्यावर संशय घेता का? अशी विचारणा करताच आरोपी पतीने पत्नीला पट्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
घटनेनंतर पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीवर मारहाण व शिविगाळ करीत दमदाटी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
दरम्यान या मारहाणीनंतर पत्नीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Woman president of self-help group beaten up
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study