Home जळगाव इन्टाग्रामवर ओळख,  शरीरसंबंध, महिलेने तगादा लावल्यावर असं काही झालं की…

इन्टाग्रामवर ओळख,  शरीरसंबंध, महिलेने तगादा लावल्यावर असं काही झालं की…

Breaking News | Jalgoan Crime: इन्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेसोबत एका तरुणाने शरीरसंबंध (Rape) ठेऊन लग्नास अमिष दाखवलं अन् धोका दिल्याची माहिती.

woman posted on Instagram about identity, physical relationship

जळगाव: सध्या सोशल मीडियावर गुन्हेगारीचं मोठं जाळं तयार होत असल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर अमिष दाखवून अनेक तरुण तरुणींना आर्थिक किंवा मानसिक जाळ्यात अडकवलं जातं. त्यानंतर त्यांचा फायदा घेतला जातो, असा घटना समोर येत असतात. अशातच आता जळगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इन्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेसोबत एका तरुणाने शरीरसंबंध ठेऊन लग्नास अमिष दाखवलं अन् धोका दिल्याची माहिती मिळतीये. आरोपी एकनाथ याने महिलेला गोड बोलून जाळ्यात अडकवलं होतं.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिलाचा विवाह 2018 मध्ये झाला होता. मात्र, पतीशी पटत नसल्याने महिला मागील दोन वर्षापासून माहेरी अमळनेर तालुक्यातील एका गावात माहेरी राहत होती. महिलेला पती त्रास देत असल्याने महिलेने माहेरी येण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी इन्टाग्रामवर तिला 2021 मध्ये एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. एकनाथ छबिलाल पवार असं या तरुणाचं नाव होतं. एकनाथशी तरुणाची चांगली मैत्री झाली. हळूहळू तरुणीचं एकनाथवर प्रेम जडलं. एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवलं. पीडित महिलेशी खापरखेडा, सोनवद आणि पुणे येथे वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

मात्र जेव्हा जेव्हा तरुणीने लग्नाचा विषय काढला, तेव्हा तरुणाने लग्नास टाळाटाळ केला. लग्नाचा तगादा लावल्यावर दोघांमध्ये भांडणं झाली. परंतू या काळात महिला गरोदर राहिल्यानंतर एकनाथ घाबरला अन् त्याने पळ काढला. लग्नास टाळाटाळ केल्यानं सदर महिलेने पोलिस ठाणं गाठलं अन् एकनाथविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एकनाथ छबीलाल पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणात अधिक माहिती घेत आहेत.

Web Title: woman posted on Instagram about identity, physical relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here