Home अहमदनगर अहमदनगर: एसटी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात महिला ठार

अहमदनगर: एसटी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात महिला ठार

Ahmednagar, Parner Accident:  एसटी बसला ओव्हर टेक करत असताना झाला अपघात.

Woman killed in ST bus-bicycle accident

पारनेर: दुचाकी व एसटी अपघातात राळेगण थेरपाळ येथील महिला जागीच ठार झाली असून एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ताराबाई अर्जुन कोळेकर (वय ५०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राळेगण थेरपाळ येथील रहिवासी अर्जुन येधु कोळेकर (वय ५५) व पत्नी ताराबाई अर्जुन कोळेकर (वय ५०) हे संध्याकाळी साडे सहा वाजता शिरूर वरून दुचाकी गाडीने (एम एच १६ ए सि ५०३८) वरून राळेगण कडे येत असताना शिरूर ओतूर या एस टी बसला (एम एच ०६ एस ८९४२ ) ओव्हर टेक करत असताना अपघात झाला.

यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. पती बाजूला उडून पडल्याने किरकोळ दुखापत झाली. स्थानिक हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. तर मृत महिलेला पारनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Woman killed in ST bus-bicycle accident

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here