संगमनेर: बचत गटाला गंडा घातलेल्या महिलेचा तब्बल वीस वर्षांनंतर शोध
Breaking News | Sangamner Crime: बचत गटाची ६७ हजार रुपयांची फसवणूक करून गायब झालेल्या महिला आरोपीचा तपास लावण्यात.
संगमनेर: बचत गटाची ६७ हजार रुपयांची फसवणूक करून गायब झालेल्या महिला आरोपीचा तपास लावण्यात संगमनेर शहर पोलिसांना तब्बल वीस वर्षांनंतर यश आले आहे.
संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील मंदाकिनी गंगाधर नवले (वय ४७) या महिलेने बचत गटातील महिलांची २००४ झाली ६७ हजार रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर या महिलेविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास सुरू असताना ही महिला ओतूर रोड, कळवण येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव व पोकॉ. शशिकांत दाभाडे यांनी कळवण येथे जाऊन तपास केला असता सदर महिला मिळून आली. पोलिसांनी तिला न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. या महिलेला आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची कल्पनाही नव्हती. पोलिसांनी तिला कल्पना देऊन न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
Web Title: woman in the crime of fraud is found after twenty years
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study