अहमदनगर ब्रेकिंग: धावत्या बसमध्ये महिलेचा मृत्यू
Ahmednagar | Kopargaon: महिलेचा धावत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (dies) झाल्याची घटना.
कोपरगाव | अहमदनगर: जिल्ह्यातील कोपरगाव परिसरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचा धावत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिला बसमध्ये अचानक बेशुद्ध पडल्याने चालकाने बस थेट ग्रामीण रुग्णालयात नेली. मात्र तिथे तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
नबाबाई सोनवणे (वय ४५) या नंदुरबारला जाण्यासाठी आपल्या नातेवाईकांसह अहमदनगर येथून श्रीगोंदा- धुळे) बसमध्ये बसल्या होत्या. मात्र बस कोपरगाव परिसरात आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला आणि धावत्या बसमध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यावेळी आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार वाहकाने मृत महिलेच्या नातेवाईकांना पुढील प्रवासाच्या तिकिटाचे पैसे परत करत माणुसकीचे दर्शन घडवले. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: Woman dies in running bus