Home अहमदनगर कडबाकुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

कडबाकुट्टी मशीनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: कडबाकुट्टी मशीनमध्ये साडी अडकल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू.

Woman dies after getting stuck in Kadbakutti machine

वाळकी : शेतात जनावरांसाठी कुट्टी करत असताना, कडबाकुट्टी मशीनमध्ये साडी अडकल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी शिवारात असलेल्या शिरकांडमळा येथे गुरुवारी (दि.८) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

अलका रामकृष्ण सुरकुंडे (वय ३४, मूळ रा. माहूर, जि. नांदेड, हल्ली रा. शिरकांडमळा, वाळकी) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला व तिचे कुटुंब मजुरीसाठी नांदेडहून नगर तालुक्यात आलेले असून, येथील नानासाहेब अर्जुन कासार यांच्या शेतात मजुरी करत आपली उपजीविका भागवत आहे. गुरुवारी (दि.८) सकाळी दहाच्या सुमारास त्या शेतात

जनावरांसाठी कडब्याची कुट्टी करत होत्या. अचानक त्यांची साडी कुट्टी मशीन मध्ये अडकल्याने त्यांना मार लागून मोठी दुखापत झाली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांची बहिण लता श्रीरंग बेल्हे व नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याबाबतची माहिती जिल्हा रुग्णालयातील दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जठार यांनी नगर तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल एस. बी. थोरात हे करीत आहेत.

Web Title: Woman dies after getting stuck in Kadbakutti machine

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here