Home अहमदनगर अहमदनगर: डम्परच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू

अहमदनगर: डम्परच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू

Breaking News | Ahmednagar: बस स्थानकाजवळ भरधाव डम्परच्या धडकेने महिला जागीच ठार.

woman died on the spot after being hit by a dumper

श्रीगोंदा : अहमदनगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव (ता.श्रीगोंदा) येथील बस स्थानकाजवळ भरधाव डम्परच्या धडकेने महिला जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी (दि.२८) दुपारी चारच्या सुमारास घडली. रेखा राजेंद्र गायकवाड (वय ४०, रा. दौंड) असे अपघातातील मृत

महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास दौंडकडून नगरकडे रेखा राजेंद्र गायकवाड, रवींद्र राजेंद्र गायकवाड हे मायलेक दुचाकीवरून जात होते. घारगाव परिसरात नातेवाइकांचा फोन आल्याने, त्यांना भेटण्यासाठी रेखा गायकवाड या घारगाव येथे मागे चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरील तोल सुटला आणि पाठीमागून भरधाव येणाऱ्या खडीच्या डम्परच्या पाठीमागील चाकाखाली गेल्या. त्यामुळे रेखा गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. नगर-दौंड रस्त्यावरील काष्टी, घारगाव, ढोकराई फाटा परिसरात अपघात नित्याचेच झाले आहेत. रस्ता चकाचक झाल्याने वाहनांचा वेगही वाढला आहे.

Web Title: woman died on the spot after being hit by a dumper

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here