Home अहमदनगर अहमदनगर: महिलेची आत्महत्या दोरीच्या साह्याने घेतला गळफास

अहमदनगर: महिलेची आत्महत्या दोरीच्या साह्याने घेतला गळफास

Breaking News | Ahmednagar: महिलेने राहत्या घरात दुपारच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या.

woman committed suicide by hanging herself with a rope

श्रीरामपूर : श्रीरामपुर तालुक्यातील निपाणी वडगाव (अशोक नगर) येथील मोहटा देवी मंदिर परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या चंद्रकला निवृत्ती नाकाडे, (वय ५५) ह्या महिलेने राहत्या घरात दुपारच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

या घटना दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी घडलेली असावी अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सुनबाई गवत घेण्यासाठी गेली होती, तर नातवाने घरात प्रवेश करतास त्याला समोरील घटना दिसली. यावेळी त्यांनी परिसरातील नातेवाईक व शेजारी मंडळी यांना घटनेची माहिती दिली.

तसेच स्थानिक नागरिकांनी या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे या ठिकाणी माहिती कळविली. यावरून पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाईक व नागरिकांच्या साह्याने मृत महिलेचे शव रुग्णवाहिकेचा माध्यमातून श्रीरामपूर येथील साखर कामगार शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. शवविच्छेदनानंतर वृद्ध महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. शोकाकुल वातावरणात संबंधित मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निपाणी वडगाव परिसरात आत्महत्यांची घटना वाढत्या असल्याने याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: woman committed suicide by hanging herself with a rope

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here