Home अहमदनगर अहमदनगर: सहकार्यांना मेसेज करून महिलेची आत्महत्या

अहमदनगर: सहकार्यांना मेसेज करून महिलेची आत्महत्या

Breaking News | Ahmednagar: वाचनालय चालवणाऱ्या रूमा विठ्ठल सोनाळे (वय ३४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Woman commits suicide by texting colleagues

पाथर्डी : वाचनालय चालवणाऱ्या रूमा विठ्ठल सोनाळे (वय ३४) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी ‘वाचनालय सांभाळा,’ असा मेसेज मोबाइलवरून आपल्या सहकाऱ्यांना टाकले होते.

या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूमा सोनाळे या पाथर्डी तालुक्यातील बोरसेवाडी येथील बलखंडीनाथ वाचनालयाच्या अध्यक्षा होत्या. सोनाळे यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, त्यांनी मृत्यूपूर्व मोबाइलवर आपल्या सहकाऱ्यांन मेसेज टाकला. मॅडम, मी चाललेय आज. माझा गोपाल मोठा होईपर्यंत वाचनालय सांभाळा. पांडू, आप्पा खूप चांगले आहेत. त्यांना घेऊन सगळे काम करा. लक्ष द्या मॅडम, माझ्य गोपालसाठी, असा मेसेज पाठवून रुमा सोनाळे यांनी आपली जीवनयात्रा संपविली. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रंथालय संघटनेत शोककळा पसरली आहे त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले. याबाबत शहरासह तालुक्यात चर्चा आहे.

Web Title: Woman commits suicide by texting colleagues

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here