Home बीड धक्कादायक! महिला दिनालाच पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार

धक्कादायक! महिला दिनालाच पोलीस कर्मचाऱ्याकडून महिलेवर अत्याचार

Breaking News  Beed Crime: बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानंच महिलेवर अत्याचार केलाय.

Woman assaulted by police officer on Women's Day

बीड : एकीकडं जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होत असतानाच बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानंच महिलेवर अत्याचार केलाय. या घटनेमुळं महाराष्ट्र हादरला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.. तसंच आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही काळात पीडिता कामानिमित्त बीडमधील एका पोलीस ठाण्यात ये-जा करत होती. यावेळी ती पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर याच्या संपर्कात आली. दोघांच्या मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. यातून त्यांच्यात संभाषण होऊ लागलं. या संधीचा लाभ घेत पोलीस कर्मचाऱ्यानं महिला दिनानिमित्त कार्यक्रम आहे, असं सांगून पीडित महिलेला बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडितेनं आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील हेदेखील पोलीस ठाण्यात आले. त्यांनी तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आलं. तर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.

Web Title: Woman assaulted by police officer on Women’s Day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here