Home महाराष्ट्र प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा; शस्त्राने वार, गळा दाबून खून

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा; शस्त्राने वार, गळा दाबून खून

Breaking News |Crime:  पत्नी, प्रियकर व इतरांनी पतीचा घरात गळा दाबून तसेच धारदार शस्त्राने पोटात वार करून खून.

With the help of the lover, the wife removed the thorn Murder 

गेवराई : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पती-पत्नीत नेहमी भांडणे होत होती. याच कारणावरून पत्नी, प्रियकर व इतरांनी पतीचा घरात गळा दाबून तसेच धारदार शस्त्राने पोटात वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह शहागड येथील गोदावरी नदीपात्रात टाकून दिला. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पत्नी, प्रियकर व इतरांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.

राजू राकेश पाटील (वय ३५, रा. लक्ष्मीकांत नगर, इंदेवाडी ता. जि. जालना) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. राजू याची पत्नी मंजूषा व तिचा प्रियकर धनंजय उर्फ धनू ज्ञानेश्वर डोईजड (रा. लक्ष्मीकांत नगर, इंदेवाडी, ता. जि. जालना) यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने नेहमी पती-पत्नीत भांडणे होत होती.

सोमवारी पत्नी, प्रियकर व इतर साथीदारांनी मिळून राजू याच्या इंदेवाडी येथील राहत्या घरामध्ये त्याचा गळा आवळून त्याच्या पोटात, छातीत चाकूसारख्या हत्याराने खुपसून ठार मारले.

नंतर हातपाय बांधून मृतदेह शहागड येथील गोदावरीत नदीपात्रात टाकून दिला. गेवराई ठाण्याच्या हद्दीत मृतदेह सापडून आल्यानंतर तपासात या खून प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी मयत राजू याची बहीण दीपा कृष्णा मुसळे (रा. राजपुतवाडी, सामनगाव रोड, जालना) हिने दिलेल्या फिर्यादीवरून राजू याची पत्नी मंजूषा राजू पाटील व तिचा प्रियकर धनंजय तसेच इतर साथीदारांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी फरार आहेत. तपास स.पो.नि. सतीश कोटकर हे करत आहेत.

मंडपाची झालर, पत्नीच्या साडीने बांधला होता मृतदेह

राजू याचा मृतदेह हा शहागड गेवराई येथील गोदावरी नदीपात्रात आढळला. त्याचे पाय साडीने व मंडपाच्या झालरच्या साह्याने बांधलेले होते. त्याच्या अंगावर चाकूसारख्या हत्याराने छातीवर, पोटावर खुपसल्याच्या खुणा आहेत. त्यावरून त्याला जिवे मारून गोदावरी नदीच्या पाण्यात टाकून दिल्याचे दिसत आहे. त्याचे पाय बांधून गुंडाळलेली साडी ही त्याची पत्नी मंजूषा हिची असल्याचे फोटोमध्ये दिसल्याचे मयत राजू याची बहीण दीपा मुसळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

चार वर्षापासून होत होते भांडण

राजू व मंजूषा यांचा सहा वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगा ऋतुराज (वय ३) व मुलगी श्रद्धा (वय ५) आहे. ते दोघे इंदेवाडी येथे राहत होते. दरम्यान, मंजूषा व राजू यांच्यात चार वर्षांपासून घरगुती भांडण होत असे. जानेवारी २०२४ मध्ये भांडण झाल्यानंतर जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती.

Web Title: With the help of the lover, the wife removed the thorn Murder 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here