Home संगमनेर संगमनेर: प्रियकराच्या मदतीने आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव

संगमनेर: प्रियकराच्या मदतीने आईनेच घेतला पोटच्या मुलांचा जीव

Breaking News | Sangamner: दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आले समोर.  

With the help of her lover, the mother took the lives of her children

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश सारंगधर पावसे आणि प्रणव पावसे या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १७ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. 

दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली असून मुलांची आई आणि तिच्या प्रियकरानेच दोन्ही मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी बुधवारी (दि.१९) सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कविता सारंगधर पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) आणि तिचा प्रियकर सचिन बाबजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून सचिन याला अटक करण्यात आली आहे. रितेश (वय १२) आणि प्रणव (वय ८) या दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू घातपातामुळे झाला आहे. त्यामुळे संबंधितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे-पाटील यांनी अधिक तपास केला असता पोलिसांना प्रत्यक्ष साक्षीदार मिळाला.

पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविल्यानंतर सदर मुलांचा घातपात झाल्याचे समोर आले. मयत मुलांची आई कविता पावसे आणि सचिन गाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. या दोघांनीच या दोन्ही मुलांना गावातील एका शेततळ्यात टाकून त्यांचा खून केल्याचे समोर आल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: With the help of her lover, the mother took the lives of her children

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here