Home अहमदनगर अहमदनगर: वायरमन दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

अहमदनगर: वायरमन दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Ahmednagar News:  वीजपुरवठा खंडित करण्यासाठी २ हजारांची लाच (Bribe).

Wireman in anti-corruption department's net while accepting bribe

जामखेड : घराचे बांधकाम सुरू असल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्याच्या बदल्यात दोन हजारांची लाच घेताना जामखेड येथील कंत्राटी वायरमला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संतोष शांतीनाथ अष्टेकर (वय ४५ वर्षे, रा. जामखेड) असे अटक केलेल्या कंत्राटी वायरमनचे नाव आहे.

तो विद्युतवितरण कंपनीच्या जामखेड उपकेंद्रात बाह्यस्त्रोत वायरमन म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे खाडेनगर परिसरात घराचे बांधकाम सुरू आहे. या प्लॉटसमोरून वीजवितरण कंपनीची विद्युत वाहिनी आहे. विद्युतपुरवठा चालू असताना बांधकाम करताना विजेचा धक्का लागून धोका होण्याची शक्यता असल्याने काम सुरू असेपर्यंत किमान 2 तासांसाठी या वाहिनीचा विद्युतपुरवठा खंडित करण्याची विनंती तक्रारदार यांनी अष्टेकर यांच्याकडे केली होती.

त्यानुसार वायरमनने दोन तास विद्युतपुरवठा खंडित करून दिला होता. त्या बदल्यात तक्रारदार यांनी शुल्क म्हणून ५०० रुपये दिले होते. सोमवारी पाचवेळा विद्युतपुरवठा खंडित केल्याचे सांगून आरोपीने प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना तक्रारदार यांच्या बांधकामाजवळ आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याने यापूर्वीही ५०० रुपये लाच घेतल्याची कबुली दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरिक्षक शरद गोर्डे, पोलिस अंमलदार रमेश चौधरी, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, दशरथ लाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Wireman in anti-corruption department’s net while accepting bribe

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here