बाळासाहेब थोरात यांना भाजपामध्ये प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Balasaheb Thorat News: कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत.
Balasaheb Thorat : नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर (Nashik Graduate Election) काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली होती. तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. सत्यजीत तांबे (Satyjeet Tambe) यांनी भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही, असं स्पष्टीकरण देखील थोरात यांनी दिलंय.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, BJP Chandrasekhar Bawankule said, कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. आज पत्रकार परिषदेत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम; आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही”, अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.
Web Title: Will Balasaheb Thorat be admitted to BJP Chandrasekhar Bawankule said
Also See: Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App