Home बीड पती-पत्नीचे भांडण, बायको गावाला गेली; नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार

पती-पत्नीचे भांडण, बायको गावाला गेली; नराधम बापाकडून मुलीवर अत्याचार

Breaking News | Beed Crime: जन्मदात्या पित्याकडून आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार.

Wife went to village daughter abused by homicidal father

बीड: बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्याकडून आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महिलांवरील अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलिसांकडून तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला जात असतानाही, अशा घटना वारंवार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यातच, बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतून नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आली आहे.

जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षीय मुलीवर अत्याचार (abused) केला. या नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेकनूर येथील एका गावात पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली. तर, मुलगी घरी एकटी होती. शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीची आई पुण्यावरून परत आल्यानंतर सदरील प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, पीडितेच्या आईने याबाबत नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आईच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Wife went to village daughter abused by homicidal father

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here