Breaking News | Ahmednagar: नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना.
राहुरी : तालुक्यातील गुहा येथील नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात पत्नी ठार, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. मीराबाई केशव केदार (वय ५९) असे मयत पत्नीचे नाव आहे.
श्रीरामपूरच्या दत्तनगर येथील केशव मारुती केदार व त्यांच्या पत्नी मीराबाई केशव केदार हे दाम्पत्य गुहा येथील आपल्या नातेवाइकाच्या घरी सोमवारी (दि. ६) रात्री जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास लुनावर
श्रीरामपूर येथे जाताना नगर-मनमाड महामार्गावर गुहा शिवारात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत केदार दाम्पत्य रस्त्याच्या बाजूला दूरवर उडून पडले. या धडकेच्या आवाजाने शेजारी असलेल्या हॉटेलचे मालक ऋषी कोळसे व शशी कोळसे, संजय पांढरे, राजू उन्हे, सतीश गायकवाड यांनी धावत येऊन बेशुद्ध जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी राहुरी येथे नेले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मीराबाई केशव केदार (वय ५९) यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.
Web Title: Wife killed after being hit by a motorcycle
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study