Home महाराष्ट्र पत्नी परपुरुषासोबत…अन पतीनं खेळ संपवला आणि बॉडीजवळ ठेवली चिठ्ठी

पत्नी परपुरुषासोबत…अन पतीनं खेळ संपवला आणि बॉडीजवळ ठेवली चिठ्ठी

Breaking News | Sindudurg Crime: परपुरूषाबरोबर पत्नीला फिरताना पाहिल्याने पतीचा राग अनावर, संतापलेल्या पतीनं चक्क पत्नीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Wife affair)

wife affair...an husband finished the game and kept the note near the body

सिंधुदुर्ग:  पत्नीनं अर्ध्या डावात धोका दिला हे सहन न झाल्यानं संतापलेल्या पतीनं चक्क पत्नीलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब-याच वेळा परपुरूषाबरोबर पत्नीला फिरताना पाहिल्याने पतीचा राग अनावर झाला. प्रत्येकवेळी तळपायाची आग मस्तकात जायची. वारंवार तिला समजावून सुद्धा ती ऐकायची नाही असा दावा पतीनं केला

अखेर एकदाच कायमचा सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून पतीने तिला जाब विचारला. अखेर संतापलेल्या पतीनं हा विषय कायमचा संपवला आणि पत्नीलाही संपवल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्याचं त्याने आपल्या मुलीला सांगितलं. ही धक्कादायक घटना भडगाव धनगरवाडी इथे ही घटना घडली.

ओमप्रकाश बंधन सिंह याने आपल्या पत्नीला ठार मारले आणि तो पळून गेला. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी कुडाळ पोलिसांनी पथक रवाना झालं असून मुंबई रेल्वे पोलिसांची मदत घेतली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

नेरूर कविलगाव येथे सिंह कुटुंब राहतात ओमप्रकाश सिंह व त्यांची पत्नी सौ रेणुका सिंह यांना तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. ओमप्रकाश सिंह हा सेंट्रींगची काम घेतो आणि या कामामधून मार्च 2024 मध्ये त्याला भडगाव येथील सेंट्रींगचे काम मिळाले. काही दिवस कवीलगाव आणि काही दिवस भडगाव येथे पती-पत्नी राहत होते.

दरम्यान या घटनेबाबत त्यांची मुलगी रिया ओमप्रकाश सिंह हिने कुडाळ पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आई आणि तिच्या वडिलांचं फारसं पटत नव्हतं. त्यांच्यात सतत भांडणं होत होती. वडील कायम आईवर चारित्र्यावरुन संशय घ्यायचे. ही भांडण होत असताना हिला कधीतरी मी ठार मारून कोठडीत जाईन असे बोलत असत.

13 ऑक्टोंबर रोजी वडील ओमप्रकाश यांनी आई रेणुका हिला भडगाव येथे बोलवलं त्याच दिवशी संध्याकाळी रियाचं बोलणंही आईसोबत झालं. 14 ऑक्टोंबर रोजी रियाने आईला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत फोन बंद येत होता. अखेर रियाने आपल्या मैत्रिणीसोबत भडगाव धनगरवाडी इथे आई राहत असलेल्या घरी जायचा निर्णय घेतला. घराला कुलूप दिसलं म्हणून ती आणि मैत्रीण पुन्हा कुडाळला आले.

दरम्यान 15 ऑक्टोंबर रोजी रिया हिचे वडील ओमप्रकाश याने पहाटे ४:४८ वाजता भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आपल्या पत्नीला ठार मारल्याचे सांगितले. आणि चावी चुलीमध्ये आहे. ती घेऊन दरवाजा उघडा तिचे साहित्य बाजूलाच आहे असे सांगितले. त्यानंतर रिया हिने आपल्या नातेवाईकांना फोन लावून पोलीस ठाण्याची संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

ओमप्रकाश सिंह यांने मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठी लिहून ठेवली या चिठ्ठीमध्ये असे लिहिले होते की माझ्या पत्नीने मला धोका दिलेला सहन झाला नाही तिला अनेक वेळा पर पुरुषाबरोबर फिरताना मी पाहिले तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती मला सोडण्याचा विचार करत होती आणि हे मला मान्य नव्हते म्हणून मी तिला ठार मारले ही चिठ्ठी ओमप्रकाश सिंह यांच्या हस्ताक्षरात असल्याचे तिची मुली रिया सिंह हिने सांगितले.

Web Title: wife affair…an husband finished the game and kept the note near the body

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here