आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा डोक्यात कुदळ मारून खून
Nandurbar Crime: आपसातील वादातून पतीनेच आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा डोक्यात कुदळ मारून खून केल्याची घटना.
तळोदा (जि. नंदुरबार):आपसातील वादातून पतीनेच आरोग्यसेविका असलेल्या पत्नीचा डोक्यात कुदळ मारून खून केल्याची घटना नळगव्हाण (ता. तळोदा) शिवारात घडली. याबाबत पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना राकेश वळवी (३२, रा. नळगव्हाण, ता. तळोदा), असे मयत महिलेचे नाव आहे.
राकेश मोतिराम वळवी, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वंदना व राकेश हे रविवारी शेतात गेले होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात वंदनाच्या डोक्यात कुदळ मारून ठार केले. त्यानंतर मृतदेह गावालगतच्या नदीकिनारी टाकून तो घरी आला. सकाळी मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी राकेश वळवी यास ताब्यात घेतले.
Web Title: Wife, a health nurse killed by hitting her head with a spade
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News