Home अहमदनगर अहमदनगर: पेट्रोल टाकून विधवेचे घर पेटविले

अहमदनगर: पेट्रोल टाकून विधवेचे घर पेटविले

Breaking News | Ahmednagar: एका विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले असून जाळपोळ व वाहनाची मोडतोड केल्याचा प्रकार.

widow's house was set on fire by pouring petrol news

 

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर येथील खटकळी गावठाण येथे झालेल्या भांडणातून दहशत पसरविण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. यात एका विधवेचे घर पेट्रोल टाकुन जाळण्यात आले असून जाळपोळ व वाहनाची मोडतोड केल्याचा प्रकार घडला.

या घटनेची सर्वत्र चर्चा झाली असली, तरी त्या व्यक्तीच्या दहशतीमुळे फिर्याद देण्यास कोणीच पुढे येत नसल्याने पोलिसांनी याप्रकरणी फिर्यादी होवून गावात दहशत पसरविणाऱ्याला धडा शिकवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेलापूर परिसरात खटकळी गावठाण येथे एक विधवा आपल्या तीन मुलांसह राहते. तिच्या शेजारी असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने गोंधळ घालुन तिला शिवीगाळ केली. त्याच्या धाकाने ती श्रीरामपूर येथील नातेवाईकांकडे राहण्यास गेली असता त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पेट्रोल टाकुन घरातील सर्व संसारोपयोगी सामान पेटवून दिले. तसेच त्या परिसरात दहशत निर्माण केली. त्याच्या दहशतीमुळे अनेकजण घाबरले आहेत. काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे दहशत करुन काही मोटारसायकली तसेच घरातील सामान पेट्रोल टाकुन जाळले होते. याबाबत बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. येथे कायम गुन्हेगारांचा वावर असल्यामुळे लहान-मोठ्या तक्रारी होत आहेत. तसेच काही

तडीपार गुंडही येथे राजरोसपणे आश्रय घेतात. याचाच परिणाम म्हणून काल सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा परिसरात दहशत पसरविण्यासाठी पेट्रोल टाकुन त्या गरीब विधवेचे संसारोपयोगी सामान जाळण्यात आले आहे. काल मंगळवारी दिवसभर गावात या घटनेची चर्चा सुरू होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली. परंतु ती विधवा प्रचंड दहशतीखाली असल्यामुळे तक्रार देण्यास पुढे आली नाही. असे प्रकार पुन्हा-पुन्हा होत राहीले तर भविष्यात एखादी गंभीर घटना घडू शकते, त्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेवून संबधीतावर कठोर कारवाई करावी, अशी परिसरातील नागरीकांची मागणी आहे.

Web Title: widow’s house was set on fire by pouring petrol

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here