Home क्राईम Murder: विधवा महिलेची प्रियकराने दगडाने ठेचून केली हत्या

Murder: विधवा महिलेची प्रियकराने दगडाने ठेचून केली हत्या

Jalana Murder Case:  प्रियकराने महिलेचा दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह पुलाखाली फेकला.

widow was murder by her boyfriend by crushing her with a stone 

जालना: प्रियकराने महिलेचा दगडाने ठेचून हत्या करून मृतदेह पुलाखाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित विधवा महिलेची हत्या तिच्या प्रियकारने केली असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

महादेव कडुकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेनं एक लाख रुपयांची मागणी करत पैसे देण्यासाठी प्रियकराकडे तगादा लावला होता. याचाच राग मनात ठेवून आरोपी कडुकरने पीडित महिलेची हत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोधळापुरी शिवारात एका महिलेचा मृतदेह (Woman Dead body) आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तपासाची सूत्रे हाती घेत चक्रे फिरवली. त्यानंतर पोलीस सूत्रांच्या मदतीने आरोपी महादेव कडुकर याचा शोध घेवून त्याला अटक केली. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.

महिलेचा दगडाने ठेचून खून (Murder) करून तिचा मृतदेह पुलाखाली फेकला, अशीही माहिती आरोपी कडुकरने पोलिसांना दिली. पीडित महिलेशी गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसबंध होते. सदर महिलेने एक लाख रुपयांची मागणी करत तगादा लावला होता. त्यामुळे रागाच्या भरात महिलेची हत्या केली, असा जबाब आरोपी कडुकरने पोलिसांना दिला.

Web Title: widow was murder by her boyfriend by crushing her with a stone 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here