Home महाराष्ट्र माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं...

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या का झाडण्यात आल्या? हत्येमागचं कारण आलं समोर

Breaking News | Baba Siddique Shot Dead:  राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या, राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Why were bullets fired at former state minister Baba Siddiqui

मुंबई : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांच्या हत्येमागेच संभाव्य कारण समोर आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  बाबा सिद्दिकी यांची हत्या ही एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली, असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने वा अधिकृत व्यक्तीने माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्या हत्येला एसआरए प्रकल्पाच्या वादाची किनार आहे. दुसरीकडे सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींचे बिश्नोई गँगशी संबंध असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने तपास करत आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्यावर एकूण तिघानी गोळीबार केला आहे. यातील दोन आरोपींची नावे ही करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आहेत. यातील पहिला आरोपी करनैल सिंह हा हरियाणा तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा आहे. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी हे तीनही आरोपी रिक्षाने घटनास्थळी आले होते. तीनही आरोपी बाबा सिद्धिकी याची वाट पहात त्या ठिकाणी थांबले होते. या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष गोळ्या घालणाऱ्या तिघांव्यतिरिक्त आणखी एका आरोपीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा चौथा आरोपी तिघांना मार्गदर्शन करत होता. पोलिसांना तशा संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी मागील अनेक दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवत होते.

Web Title: Why were bullets fired at former state minister Baba Siddiqui

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here