Home अहमदनगर अहिल्यानगर मधून मंत्रीपदाची शपथ कोण घेणार? अमोल खताळ नावाची चर्चा

अहिल्यानगर मधून मंत्रीपदाची शपथ कोण घेणार? अमोल खताळ नावाची चर्चा

Ahillyanagar Assembly Elecion 2024: राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मंत्रिमंडळात फायनल असेल मात्र आणखी कोणाला संधी मिळणार.

Who will take oath as minister from Ahilyanagar

Ahilyanagar News: विधानसभेच्या निवडणुकीत बारापैकी दहा जागा महायुतील देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान असणार हे निश्चित आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मंत्रिमंडळात फायनल असेल, मात्र जिल्ह्यात आणखी कोणाला संधी मिळेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राधाकृष्ण विखे पाटील, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे, आशुतोष काळे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरातांना पराभूत केलेले नवखे अमोल खताळ यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आता मुख्यमंत्री होऊन मंत्रिमंडळही निश्चित होणार आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला संधी मिळते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. या वेळी शिर्डीतून एकहाती विजय मिळवलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्याचे मंत्री असतील, मात्र अन्य आमदारांतही संधी मिळण्यासाठी प्रयत्त सुरू आहेत.

कर्जत-जामखेडमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले, पालकमंत्री राहिलेले राम शिंदे यांचा निसटता पराभव झालेला असला तरी ते विधान परिषदेचे आमदार असून त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची कर्जत-जामखेडला आशा आहे. नगर शहरातून संग्राम जगताप तिसऱ्यांदा तर कोपरगावांतून आशुतोष काळे दुसऱ्यांदा जिंकले.

यांच्यातून कोण मंत्री होणार आणि पाथर्डीतून मोनिका राजळे तिसऱ्यांदा जिंकल्या आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले याआधी पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. यांच्यातून कोण मंत्री होणार तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांना हरवलेले अमोल खताळ नवखे असले तरी त्यांनाही मंत्रिपद मिळू शकते, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. खताळ शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार आहेत.

Web Title: Who will take oath as minister from Ahilyanagar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here