ज्याला जिवलग मित्र मानायचा त्यानंच ठेवलं पत्नीसोबत अनैतिक संबंध, एका हत्येनं खळबळ
Buldhana Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने मित्रानेच मित्राची हत्या (Murder) केल्याचं पोलिस तपासात समोर.
बुलढाणा: पती-पत्नीमधील वाद आणि त्यातून घडणारे धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार तालुक्यातील पळसखेड येथे 29 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. राजाराम जायभाये असं मृत तरुणाचे नाव असून संतोष मदन थोरवे यानेच त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात संतोष याचा ताब्यात घेतले असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने संतोषने राजाराम यांची हत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम आणि संतोष हे दोघं जिवलग मित्र होते. दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. त्याचवेळी संतोष याचा राजारामाच्या पत्नीवर जीव जडला. दोघांमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. पण दोघांच्या अनैतिक संबंधात राजाराम अडचण ठरत होता. त्यामुळं संतोष यांने राजारामाचा गळा आवळून खून केला.
28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे राजाराम संतोषच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी केला. मात्र, बराच काळ उलटूनही तो परत न आल्याने घरात एकच शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर राजाराम संतोषच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. राजारामने शेतात आत्महत्या केल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र, याबाबत राजारामच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. तसंच, संतोष आणि राजारामची पत्नी यांच्यावर आरोप केला होता.
राजाराम यांच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर पोलिसांनी संतोष थोरवे याची चौकशी करत त्याला ताब्यात घेतले आहे. लोणार पोलिसांनी आरोपीला अटक करुन कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास लोणार पोलीस करीत आहे.
Web Title: who was considered a close friend had an immoral relationship with his wife, a murder
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App