हल्ला करणारा कोण? आमदार अमोल खताळ यांचा थेट निशाणा; म्हणाले…
Breaking News | Sangamner | Amol Khatal: संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये हल्ला झाला.
संगमनेर: शिवसेना शिंदे गटाते आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. गणेश मंडळाचा कार्यक्रम आटपून बाहेर आल्यानंतर ते नागरिकां बरोबर हस्तांदोलन करत होते. त्याच वेळी एकाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. हल्लोखोराला तातडीने पोलिसांनी ताब्यात घेतले. अमोल खताळ यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर अमोल खताळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये हल्ला झाला आहे. गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून माघारी जात असताना एका व्यक्तीनं हात मिळवण्याच्या बाहाण्यानं हा हल्ला केला असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराच नाव गुंजाळ असल्याची माहीती समोर येत असून त्यानं हल्ला का केला याबाबत अधिकृत माहीती मिळाली नाही.
आता या हल्ल्यानं आणखी वातावरण ढवळून निघत असून हल्लेखोर समाजकंटक किंवा कोणाचा तरी हस्तक असल्याच आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे तर त्याच गणेश उत्सवात शांतता राखण्याच आवाहनही त्यांनी केले आहे. गणेशोत्सवाचा कार्यक्रम आटोपून येत असताना एका समाजकंटकाने आणि कुणाच्या तरी हस्तकाने माझ्यावर भ्याड हल्ला केला. मात्र या भ्याड हल्ल्याने मी व्यथित होणार नाही, खचणार नाही. पोलीस प्रशासन याबाबत तपास करेल आणि कोणाचे हस्तक आहेत याचा तपास होईल असं खताळ यांनी म्हटले आहे.
अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्या नंतर पुणे-नाशिक महामार्गावर टायर जाळुन निषेध व्यक्त करण्यात आलाय. भाजपा तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले आणि खताळ यांचे कट्टर समर्थक विक्रम सागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पुणे नाशिक हायवे वर टायर जाळून निषेध केल्याची माहीती समोर येत आहे. अमोल खताळ हे गणेश उत्सवाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता यानंतर आमदार खताळ यांनी शांततेचे आवाहन केल असताना ही समर्थकांकडून टायर जाळत निषेध करण्यात आलाय..
दरम्यान ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराच नाव गुंजाळ असल्याची माहीती समोर येत असून त्यानं हल्ल्या मागचं कारण अजुनही अस्पष्ट आहे. मात्र संगमनेर मध्ये मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण तापलेल पाहायला मिळत आहे. आता या हल्ल्यानं आणखी वातावरण ढवळून निघत असून हल्लेखोर समाजकंटक किंवा कोणाचा तरी हस्तक असल्याच आमदार अमोल खताळ यांनी म्हटले आहे.
Breaking News: Who is the attacker Direct target of MLA Amol Khatal