Home जालना क्रिकेट खेळताना तरुण जागेवरच कोसळला, जागीच मृत्यू  

क्रिकेट खेळताना तरुण जागेवरच कोसळला, जागीच मृत्यू  

Breaking News | Jalana: फलंदाजी करताना अचानक एक ३५ वर्षीय तरुण मैदानात कोसळला अन् त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना.

While playing cricket, the youth collapsed on the spot, died on the spot

जालना : अनेकदा क्रिकेट खेळताना किंवा बसल्या जागेवर तरुणांना ह्रदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने प्राण गमवावे लागल्याचं आपण पाहिलं आहे. आता, पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धेदरम्यान 32 वर्षीय युवकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

शहरातील आझाद मैदानावर ख्रिसमस ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी जिजस विरुद्ध यंगस्टर या संघांत क्रिकेटचा सामना सुरू होता. यावेळी फलंदाजी करताना अचानक एक ३५ वर्षीय तरुण मैदानात कोसळला अन् त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली.

विजय हरून पटेल (३५) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या यंगस्टर संघाची फलंदाजी सुरू होती. दोन खेळाडू संवाद साधून आपापल्या ठिकाणी परत जात होते. दरम्यान, विजय पटेल हे चालत असताना अचानक खेळपट्टीवर थांबले. खाली बसण्याचा प्रयत्न करत असतानाच काही कळण्याच्या आतच जमिनीवर तोल जाऊन ते निपचित पडले. खेळाडूंनी तत्काळ विजय यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

Web Title: While playing cricket, the youth collapsed on the spot, died on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here