Whether Update: राज्यात आजपासून सक्रीय होणार, या भागांत मुसळधार पावसाची शक्यता
पुणे | Whether Update: अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक वातारण निर्माण होत असतानाच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पुन्हा मोसमी पाउस सुरु होणार आहे. १० जुलैपासून राज्यात सर्वदूर पाउस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागपूर, वर्धा, आणि मराठवाड्यातील काही भागांत पाउस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या साक्रियेतेमुळे दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.
राज्यत गेल्या १० ते १२ दिवसांपासून मोसमी पाउस गायब झाला आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाउस असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसांच्या विश्रांतीमुळे पाणी साठ्यावर परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागाने पावसाचे संकेत दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त होत आहे. ८ किंवा ९ जुलैपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्यमहाराष्ट्र पर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यानंतर ११ जुलै ला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यासह मध्य भारतात पाउस सुरु होणार असून ११ जुलै रोजी पावसाचा जोर वाढणार आहे.
Web Title: Whether Update rain started in maharashtra