Home अहमदनगर अहमदनगरमध्ये केव्हा दाखल होणार मान्सून, आयएमडीने वर्तविला अंदाज

अहमदनगरमध्ये केव्हा दाखल होणार मान्सून, आयएमडीने वर्तविला अंदाज

When will the monsoon Rain arrive in Ahmednagar

Ahmednagar Monsoon  Rain | अहमदनगर:  यंदा मान्सूनचे  आगमन वेळेआधी होण्याचा अंदाज हवामान विभागाने पूर्वीच वर्तविला आहे. त्यानुसार त्याची वाटचालही सुरू आहे. मात्र, अहमदनगरमध्ये मान्सून केव्हा पोहचणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

याबाबत हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उर्वरित महाराष्ट्रात पाच जूनपर्यंत मोसमी पाऊस पोहोचू शकतो. तर १२ जून ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अहमदनगरमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: When will the monsoon Rain arrive in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here