Home क्राईम प्रेमासाठी वाट्टेल ते! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला आणि…

प्रेमासाठी वाट्टेल ते! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला आणि…

Pune Crime news : प्रेयसीच्या घरच्यांनी भेटणे बंद केल्याने प्रेमवीर थेट बुरखा घालून शाळेत गेला. प्रशासनाने थेट पोलिसांना फोन करत तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

went to school wearing a veil to meet his girlfriend and Crime

पुणे:  प्रेमासाठी कुणी झाडावर तर कुणी टाकीवर चढल्याच्या घटना तुम्ही पाहिल्या असेल ऐकल्या असले., पुण्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. प्रियसीच्या घरच्यांनी भेटणे बंद केल्याने एका प्रेमविर थेट बुरखा घालून प्रेयसीच्या भेटीसाठी शाळेत पोहचला. दरम्यान, हा तरुण बुरख्यात दिसल्याने शाळा परिसरात गोंधळ उडला. शाळा प्रशासनाने थेट पोलिसांना कॉल करत या तरुणाला त्यांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हा तरुण एका केटरिंग व्यावसायिकाकडे कामाला आहे. त्याचे एका शाळकरी मुलीवर प्रेम होते. दरम्यान, ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना कळल्यावर या तरुणाला तिच्या घरच्यांनी चांगलाच चोप देत मुलीला देखील त्याला न भेटण्याची तंबी दिली होती. दरम्यान, कुटुंबीयांनी देखील मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. या मुळे तरुणाला मुलीला भेटणे अवघड झाले. मात्र, त्याला तिला भेटण्यापासून राहवले देखील जात नव्हते. यामुळे त्याने तिला भेटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. त्याची आई जुने कपडे गोळा करण्याचा व्यवसाय करते. त्याला घरात एक बुरखा सापडला.

त्याने हा बुरखा परिधान करुन थेट प्रेयसीला भेटण्यासाठी तो शाळेच्या परिसरात गेला. मात्र, त्याला काही लोकांनी पाहिले. या मुळे त्याचे बिंग फुटले. त्यांनी शाळेच्या आवारात बुरखा घालून एकजण मुलींचे अपहरण करण्यासाठी आला असल्याची तक्रार पोलिसांना केली. शाळेने देखील ही बाब पोलिसांना सांगितली. यामुळे पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पाहत या तरुणाला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान केल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू सातपुते, दीपक चव्हाण, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: went to school wearing a veil to meet his girlfriend and Crime

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here