धक्कादायक! डॉक्टरकडे जातो म्हणून बाहेर पडला अन्; तरुणासोबत घडलं भयंकर
Kolhapur News: एका तरुणाची निर्घृण हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस.
कोल्हापूर: कोल्हापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील उचगावात एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश नामदेव संकपाळ असं हत्या झालेल्या तरुणाच नाव असून या भयंकर हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोल्हापुरातील उचगावातील तरुण गणेश नामदेव संकपाळ हे बुधवारी रात्री डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र रात्रभर तो घरी परतलाच नाही, ज्यामुळे कुटंबियही चिंतेत पडले होते. मात्र सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तींना गणेश संकपाळ याचा रक्ताच्या थारोळ्यात माखलेला मृतदेह दिसला.
या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या भयंकर घटनेचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. तरुणासोबत हे भयंकर कृत्य कोणी केले असेल, या हत्येमागचे नेमके कारण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
Web Title: went out as he was going to the doctor of a youth
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App