लग्नाच्या आदल्या दिवशी वधु बेपत्ता, त्यानंतर विहिरीत आढळला मृतदेह, हत्या केल्याचा आरोप
Amravati: ६ जुलैला नियोजित लग्न, वधू ५ जुलै रोजी सायंकाळी बेपत्ता, शेतातील विहिरीत तिचा मृतदेह (Murder).
शिरजगाव कसबा | अमरावती: ६ जुलैला नियोजित लग्न ठरलेली १९ वर्षीय वधू ५ जुलै रोजी सायंकाळी बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा मंगळवारी शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला. माझ्या मुलीची हत्या करण्यात आली असा आरोप मुलीचे वडील संजय नेवारे यांनी शिरजगाव कसबा पोलिसांकडे केला.
दिलेल्या तक्रारीनुसार, शिरजगाव कसबामध्ये गोवारीपुरा भागांमध्ये राहणारे संजय सदाशिव नेवारे यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांची मुलगी साक्षी (१९) हिचे लग्न ६ जुलैला ठरले होते. ५ जुलैला सकाळी ४ ते ५ दरम्यान ती घराबाहेर गेली. तथापि, तिचा मोबाइल हा घरीच होता. त्यामुळे ती कुठे बाहेर गेली असेल, असा कुटुंबीयांचा समज झाला. त्याच दिवसापासून ती दिसून न आल्यामुळे संजय नेवारे यांनी शिरजगाव पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाइकांनीही शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
दरम्यान, १२ जुलैला गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांचे शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. ठाणेदार प्रशांत गिते यांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह (Dead body) बाहेर काढला. मुलीच्या अंगावर अर्धवट कपड़े व जीभ बाहेर आली असल्याचे आढळले. याप्रकरणी पित्याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: wedding, followed by a body found in a well, accused of murder