जानेवारीत या तारखेनंतर राज्यात पुन्हा थंडीची लाट – हवामान विभाग
Weather Update: १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान असेल थंडीची लाट, भारतीय हवामान विभागाचा अंदाज.
पुणे: भारतीय हवामान – विभागाच्या पुणे विभागीय केंद्राद्वारे १९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. थंडीची लाट राज्यातील विविध भागात जाणवेल आणि तापमान कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जानेवारीत राज्यातील कमाल तापमान राज्यभरात सामान्य तापमानापेक्षा
कमी असेल. १९ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान या कालावधीत राज्यभरातील तापमान किमान तापमानापेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कश्यपी यांनी राज्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमान थोडंसं वाढलेलं १९ जानेवारीपर्यंत जाणवेल, असं म्हटलं. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये ही स्थिती असेल, असं ते म्हणाले. थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात जाणवेल, असंही ते म्हणाले.
तापमान कमी झाल्यानं आकाश निरभ्र असेल. १२ ते २५ जानेवारी दरम्यानच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या वार्याचा परिणाम जाणवून त्यामुळे किमान तापमान घसरेल. असं कश्यपी यांनी म्हंटल आहे. उत्तर भारतातील थंड ठिकाणाहून सुटणाऱ्या उत्तरेकडील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात थंड हवा असेल. त्यामुळे वातावरणात गारवा असेल.
Web Title: Weather Update After this date again cold wave in the Maharashtra
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News