Home अहमदनगर या तारखेला नगरसह राज्यात पावसाची शक्यता पंजाब डख व हवामान विभागाचा अंदाज...

या तारखेला नगरसह राज्यात पावसाची शक्यता पंजाब डख व हवामान विभागाचा अंदाज  

Weather Rain alert rain in the state including Panjab Dakh

Weather Rain alert | मुंबई :  राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस पडणार आहे

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गुरुवारी ( ६ जानेवारी) व  शुक्रवारी (७ जानेवारी) उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

तसेच राज्यातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी ( ६ जानेवारी), शुक्रवारी (७ जानेवारी) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पंजाब डख ((Panjab Dakh)):  3 ते 6 जानेवारी हवामान कोरडे तर 7 तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाची शकयता. राज्यात दि 3 जानेवारी पासुन हवामान कोरडे राहणार असुन 7 जानेवारी पुन्हा पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवली आहे.

आज दि. 3 जानेवारी ला बोलत असताना हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी ही माहिती दिली असुन राज्यात पुन्हा 7 जानेवारीला काही जिल्ह्यात पावसाची शक्यता त्यांनी सांगितलं आहे.

Web Title: Weather Rain alert rain in the state including Panjab Dakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here